26992154_2050647245170649_9100497500790361888_nवीस वर्षीय मीना कॉलेज ला रोज जायची. घरी मात्र धाकट्या भावा बरोबर रोज भांडण – कारण तो त्याच्या वस्तू जागेवर ठेवत नसे. अगदी तिरस्कार वाटेपर्यंत राग. बारावी पास झाल्यावर मार्क तर चांगलेच मिळाले, पण राजुला कोणत्या शहरात कुठच्या कॉलेज ला जावे हा मोठाच प्रश्न! एक कॉलेज निवडले – पण कोणी म्हंटले कि अरे त्यापेक्षा हे कॉलेज जास्तं चांगले आहे, की मन तिथे वळे. मग दुविधा मनस्थिती आणि दुविधे चा क्लेश. शिक्षणामुळे नीता चे जरा उशीराच लग्न झाले, आणि लग्नानंतर सासूशी पटेना. सासू – सून दोघीही दुःखी. रतन ला अजून नोकरी मिळालेली नाही. घरी त्याचे आई-वडील त्याला त्यावरून बोलतात. मग मनात आलेला राग घेऊनच तो बाहेर पडतो. व आस-पास गुंडगिरी करून त्या रागाची झळ कमी करतो – ती ही तात्पुरतीच.

आजकाल शारीरिक स्वास्थ्या बद्दल जागृकता वाढली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. या मुळे शारीरिक स्वस्थ्यामधे सुधारणा नक्किच होणार. याच प्रमाणे एका सुंदर आयुष्यासाठी मानसिक व भावनिक स्वास्थ्य ही गरजेचे आहे. सद्ध्या सारे Whatsapp व Facebook च्या जगात हरवत आहेत व वास्तविक आयुष्यापासून दुरावत आहेत. येणाऱ्या पिढीतील अनेक जण एका कोशात जगत असून आत्मकेंद्रीत होत असल्याचे जाणवते.

मीना, राजू, नीता व रतन (नवे बदलेली) हे आमच्या स्प्लॅश कार्यशाळेचे सभासद. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. घरी होणारी भावंडांमधील भांडणे, छोट्या गोष्टींवरून येणारा मोठा राग, हट्ट, योग्य निर्णय घेण्यात होणारी दमणूक, ब्रेक-अप, छोट्या घटनांमुळे वाटणारे मोठे दु:ख – या सगळ्या गोष्टींना वयाची ही मर्यादा नाही. या रोजरोजच्या मानसिक तणावाचे काय करावे? असाच तणाव सुरु राहिला तर दुःख निर्माण होते, व्यक्तित्व व वागणूक बदलते. तणावाचे रूपांतर शारीरिक व्याधी मध्ये होते (psychosomatic illness). यासाठी कोणाकडे मदत मागायची? कधीकधी मदतीची गरज आहे हेही कळत नाही.

स्प्लॅश (SPLASH) हे नाव आमच्या कार्यशाळेच्या पहिल्या गटातील सदस्यांनी सुचविले. पाण्याची बुद्धिमत्ता – म्हणजे गतिरोधक आला तरी परिस्थितीला सांभाळून स्वतः मध्ये बदल करून पुढेच जाण्याची पात्रता ! पाण्यात सूर मारताना, त्याचे तुषार उडतात त्यासाठी स्प्लॅश हा शब्द इंग्रजीत वापरला जातो. तसेच स्वतःच्या अंतर्मनात सूर मरून स्वतःचा शोध घेऊन स्वतःची वाढ करणे हेच या कार्यशाळेचे उद्देश्य असल्यामुळे हे नाव!

मीना व नीताला या कार्यशाळेत स्वतःची ओळख झाली. सामानानुभूती ची झलक मिळाली. भाषेचा सदुपयोग समजला, भांडण न करता आपल्या मनातले विचार कसे मांडता येतात हे कळले. त्याच परिस्थितीला तठस्थपणे कसे बघता येईल हे समजले. त्यांची रोजची भांडण-तंटा एकदाची बंद झाली. योग्य निर्णय घेण्यासाठी काय करायचे, कसा विचार करायचा, कोणते घटक बघायचे हे सर्व राजुला समजल्यावर त्याला निर्णय घेणे सोपे वाटले. रागाचे व इतर भावनांचे नियोजन हा स्प्लॅश कार्यशाळेचा मुख्य भाग! त्यात निरनिराळ्या अनुभवात्मक क्रिया करवून कौशल्य शिकविली जातात. राग आवरण्या साठी वेगवेगळी उदाहरणे देऊन सराव केला जातो. हे सर्व रतन ने कार्यशाळेत अनुभवल्यानंतर त्याच्याही मनाचे परिवर्तन होणे सुरु झाले.

स्द्ध्या आरोग्य विभाग रोगनिदान व उपचार यात गुंतलेले आहे – शिक्षण संस्थांचा स्पर्धा व शैक्षणिक कामगिरीवर भर असतो. समर्पण अवेरनेस फ़ाउंडेशन संस्थेने या दोघांतील दरी भरण्याहेतु मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी Splash कार्यशाळा सुरु करून एक छोटे पऊल उचलले आहे. शनिवार-रविवार या दोन दिवसांच्या कार्यशाळेत अध्यात्माचा पाया ठेऊन मानसशास्त्रात झालेल्या शोधांच्या सहायाने कौशल्य शिकविली जातात, जी रोजच्या जीवनात उपयोगी पडतील. नागपुरातील ज्येष्ठ बालरोगतज्ञ, लेखक व मानसशास्त्रज्ञ डॉ श्रीकांत चेरघडे, यांच्या आशिर्वादाने, डॉ सुशील गावंडे (psychiatrist) व डॉ पूर्णिमा करंदीकर (neurologist) यांनी हाँ प्रकल्प सुरु केला आहे. (नोंदणी शुल्क फक्त ५००/-) १७ वर्षांवरील व्यक्तिंसाठी २२-२३ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिटणवीस सेंटर, सिविल लाईन्स, नागपूर, येथे ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

Advertisements